१ मेपर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 03:33 AM2020-02-29T03:33:07+5:302020-02-29T03:33:29+5:30

एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद

Maharashtra will be plastic free by May 1 | १ मेपर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार

१ मेपर्यंत महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होणार

googlenewsNext

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, लोक सहभागाशिवाय प्लास्टिक बंदीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. यासाठी लोकांनीही प्लास्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहीजे, अशी भावना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केली. येत्या १ मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्ष होत आहेत. तोपर्यंत एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात २०१८ साली प्लास्टिक व थर्माकॉल बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, तरीही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मांडला. काही सदस्यांनी जाड प्लास्टिक पिशव्यांना परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, प्लास्टिक पिशव्यांमुळे कचरा आणि नाले तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असल्याने अशी परवानगी देता येणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पीओपी मृर्तींवर बंदी नाही
राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पीओपी मूर्तींवर बंदी आणणार का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर, हा प्रश्न भावनेशी निगडित असल्याने इतक्या लवकर बंदी आणता येणार नाही. मात्र गणपती सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे मखर बंद करण्यात सरकारला यश आले आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

पाण्याच्या बाटल्यांना सूट
प्लास्टिक बंदीतून पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या वगळण्यात आले आहे. या बाटल्यांचा पुर्नवापर करता येतो. तसेच त्याला अद्याप पर्याय निर्माण झाला नसल्याने त्या आताच बंद करता येणार नाही असेही, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra will be plastic free by May 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.