शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र यंदा थंडीने कुडकुडणार! तापमान ६ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:44 IST

गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमान घसरण अर्थात ग्लोबल कुलिंगवर संशोधन सुरू आहे.

औरंगाबाद : पाऊस परतीच्या मार्गावर असतानाच राज्याच्या अनेक भागांत थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे थंडी जाणवत असून, काही दिवसांत थंडीच्या तीव्रतेत वाढ होईल आणि पुणे, नाशिकसह मराठवाड्यात यंदा जानेवारीत किमान तापमान ६ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, असे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक व हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. आॅक्टोबरमध्ये किमान तापमान २१ ते २२ अंशांपर्यंत राहते, परंतु गेल्या काही दिवसांत ते १९ अंशांपर्यंत खाली आले आहे. या २ अंशाची घसरणीमुळे यंदा कडाक्याची थंडी पडेल, असे संकेत आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमान घसरण अर्थात ग्लोबल कुलिंगवर संशोधन सुरू आहे. येणारा काळही जागतिक तापमानात घसरण दर्शविणाराच दिसत आहे. दोन्हीही गोलार्धातील ध्रुवीय प्रदेशात कमालीची थंडी पडली आहे. गेल्या हिवाळ्यात उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये त्याचा फटका दिसून आला होता.काही पिकांना फायदा, द्राक्षांना फटकाअतिशय थंड वाहणारे ध्रुवीय वारे दक्षिणेला सरकल्याने संपूर्ण महाराष्ट्राला स्वेटर घालायला भाग पाडले.यंदा ध्रुवीय वारे अरबी समुद्रावरून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागांना म्हणजे गुजरात, महाराष्ट्र अशाराज्यांना त्याचा चांगलाच तडाखा बसणार आहे, असे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.राज्यात वाढत्या थंडीचा फटका खान्देशातील द्राक्ष आणि कांदा उत्पादकांना बसू शकतो. परंतु गहू, सोयाबीनया पिकांसाठी हे वातावरण फायदेशीर असेल.आॅक्टोबरातील मान्सून महाराष्ट्रात उणेचमुंबई : देशात मान्सूनचा तडाखा आॅक्टोबरमध्येही सुरूच आहे. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात मान्सून अतिरिक्त कोसळला असून, महाराष्ट्रात मात्र आॅक्टोबरमधील मान्सूनची नोंद ५० टक्के उणे आहे. झारखंड, अरुणाचल, मणिपूर, मिझोराम या राज्यांतही पावसाचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र