शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: इतका आटापिटा का...?; मुख्यमंत्रिपद न सोडणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा 'रोखठोक' सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 09:33 IST

Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन 'सामना'

मुंबई: सत्तापदांच्या समान वाटपाची मागणी करत मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचा सूर काल काहीसा नरमला. मात्र आज लगचेच 'सामना'मधून शिवसेनेनं भाजपाला लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेची आणि ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. मुख्यमंत्रिपदाबद्दल शिवसेनेला कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'सामना'मधून टोला लगावण्यात आला आहे.सत्तापदांचं समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला आणि तो सहमतीनं वापरला. आता एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे 'सत्तापदा'त येत नाही असं कुणाचं म्हणणं असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्यानं लिहावे लागतील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे सत्तापद नाही आणि त्याचं समान वाटप करता येणं शक्य नसेल असं कुणाला वाटत असेल तर त्या बिन 'सत्ते'च्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. आम्ही शब्दाला जागतो असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा 'पेच' पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर 'पेच' का पडावा? जे ठरले आहे त्यासाठी साक्षीपुराव्यांची गरज नाही, पण सध्या धर्मग्रंथावर हात ठेवून लोक शपथेवर खोटे बोलतात असा जमाना आहे. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. शिवसेनाप्रमुखांकडून हा संस्कार आम्ही घेतला आहे,' असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा