शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपावर चिडलेल्या शिवसेनेला मुनगंटीवारांनी सांगितली भित्र्या सशाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:03 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019: भित्र्या सशाची, भुकेल्या वाघाच्या गोष्टी सांगत मुनगंटीवारांचं शिवसेनेवर भाष्य

मुंबई: शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून सुरू असलेला संघर्ष सुरूच असल्याचं दिसत आहे. राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला आता भाजपानं भित्र्या सशाची गोष्ट सांगितली आहे. शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून सुरू असलेला कलगीतुरा चर्चेतून संपेल, अशी आशा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला भित्र्या सशासह वाघाचीदेखील गोष्ट सांगितली. राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं काल मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेतला. त्यावर बोलताना मी केवळ तांत्रिक बाब सांगितली. सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते, यात चूक काय, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मित्रपक्ष वड्याचं तेल वांग्यावर काढत असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.शिवसेना लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेतशिवसेनेवर भाष्य करताना मुनगंटीवार यांनी बालभारतीमधल्या एका धड्याचा संदर्भ दिला. 'मला बालभारतीच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. भित्र्या सशाची ती गोष्ट होती. झाडाचं एक पान गळून नेमकं सशाच्या पाठीवर पडतं. तेव्हा त्याला आभाळ कोसळल्यासारखं वाटतं आणि तो सैरावैरा पळू लागतो. बालभारतीमधला हा धडा मला आजही आठवतो. बाकीच्यांना तो आठवतो का ते माहीत नाही,' असं सूचक विधान मुनगंटीवारांनी केलं. महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; शरद पवार म्हणतात...शिवसेना काँग्रेससोबत जाईल का, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. शिवसेना, काँग्रेसबद्दल बोलताना त्यांनी वाघाचं उदाहरण दिलं. वाघ कितीही भुकेला असला, तरीही तो गवत खात नाही, असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. दूध साखर एकत्र येऊ शकते. पण दूध आणि लिंबू नाही एकत्र येऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना काँग्रेसचा 'हात' धरेल, ही शक्यता फेटाळून लावली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाShiv Senaशिवसेना