शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पवारांची प्रांजळ कबुली ; पावसातील सभेचा राष्ट्रवादीला फायदाच झाला, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 13:33 IST

Maharashtra Election Result 2019:सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे. याबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना, ती सभा फायद्याची ठरली, असंच म्हटलंय.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, आपल्या खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मात्र, साताऱ्यातील जनतेला उदयनराजेंचा हा निर्णय रुचला नाही. त्यामुळेच, श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यात श्रीनिवास पाटील यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. पवारांचं भाषण सुरू असताना साताऱ्यातील या सभेत मुसळधार पावसाने सभेला झोडपलं. त्यामध्ये पवारांवरही पावसाचा वर्षाव झाला. मात्र, निर्सगापुढेही नतमस्तक न होता, पवारांनी भरपावसात सभा घेतली. साताऱ्यासह महाराष्ट्रात पवारांच्या सभे क्लिप आणि फोटो व्हायरल झाले. तर, दिल्लीतही पवारांच्या सभेची चर्चा झाली. या सभेनंतर साताऱ्यात एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच, फटका उदयनराजेंना बसला. त्यामुळे, पवारांची साताऱ्यातील सभा निर्णायक ठरली. शरद पवार यांनी पावसातील सभेचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाभ झाल्याचं मान्य केलंय. माझी साताऱ्यात सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यावेळी, समोरील लोकं डोक्यावर खुर्च्या घेऊन सभा ऐकत होती. त्यामुळे, मी सभेला संबोधित करणं हे माझं कर्तव्य होतं. म्हणूनच मी पावसात भिजत सभा घेतली. मात्र, ती सभा महाराष्ट्रभर चर्चेत येईल, असं मला वाटलं नव्हतं. पण, त्या सभेचे फोटो महाराष्ट्रभर झाले आणि त्याचा फायदा आम्हाला निवडणुकीत झाला, असं पवारांनी म्हटलंय.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसsatara-pcसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019