शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुख्यमंत्र्यांना मताधिक्य कमीच, अजित पवारांना सर्वोच्च लीड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 22:07 IST

Maharashtra Election Result 2019: काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांनीही जवळपास 1 लाख 62 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवत आपला गड राखला आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळालेलं मताधिक्य हे विचार करायला लावणार आहे. मुख्यमंत्र्यांचे विरोधक काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांना 58774 मते मिळाली आहेत. तर, फडणवीस यांना 1 लाख 8 हजार 256 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा भाजपाच्या विरोधी पक्षातील नेत्यांना अधिक मताधिक्य मिळालंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 49 हजार 482 मतांनी विजय मिळवता आला आहे. 49482 मताधिक्य फडणवीस यांना आपल्या मतदारसंघातून मिळालंय. तर काँग्रेस उमेदवार आशिष देशमुखांना 58774 मते मिळाली आहेत. मात्र, फडणवीस यांच्यापेक्षा विरोधी पक्षातील नेते अजित पवार, काँग्रेस नेते धीरज देशमुख, विश्वजीत कदम, अशोक चव्हण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आणि जितेंद्र आव्हाड या उमेदवारांनी अधिक मताधिक्य मिळवत विजय खेचून आणलाय. .. बारामती मतदारसंघातून अजित पवारांना 1 लाख 95 हजार 641 मतं मिळाली आहेत. अजित पवारांचे विरोधी उमेदवार गोपीचंद पडळकर यांना फक्त 30 हजार 376 मतं मिळाली आहेत. त्यामुळे अजित पवारांना तब्बल 1 लाख 65 हजार 265 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.

काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांनीही जवळपास 1 लाख 62 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर, लातूर ग्रामीणमधून काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनीही 1 लाख 20 हजारांचं मताधिक्य घेतलंय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही लाखाच्या घरात पोहोचत 97 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जवळपास 82 हजारांचं मताधिक्य घेऊन विजय यश मिळवलं. जितेंद्र आव्हाड यांनीही जवळपास 75 हजारांचं मताधिक्य घेतलंय. बाळासाहेब थोरात यांनी 62 हजार तर दिलीप वळसे पाटील यांनी 66 हजारांच्या जवळपास मताधिक्य घेऊन मुख्यमंत्र्याना मताधिक्याच्या लढाईत पिछाडीवर ठेवलं आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर