शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आणखी एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा; सत्ता स्थापनेआधी दबावाचं राजकारण जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 11:06 IST

शिवसेना, भाजपाचं दबावतंत्र; एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न

मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवलं आहे.विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. शिवसेना, भाजपाच्या महायुतीला 161 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करू शकते. मात्र सरकारमध्ये समान वाटा मिळावा, असा आग्रह शिवसेनेनं धरला आहे. सत्तेचं समान वाटप करा, अन्यथा अन्य पर्याय खुले आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर दबाव टाकला आहे. तर शिवसेनेचे तब्बल 45 आमदार संपर्कात असल्याचा दावा करत भाजपानं खळबळ उडवून दिली आहे.सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले आहेत. प्रहारच्या बच्चू कडूंनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर आमदार रवी राणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय इतर अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा, शिवसेनेत चढाओढ पाहायला मिळत आहे. सरकार स्थापनेच्या चर्चेत आपलं पारडं जड ठरावं यासाठी दोन्ही पक्षांचे नेते सध्या कामाला लागले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना