शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: भाजपा शिवसेनेला या हाताने दोन मंत्रिपदं देणार, त्या हाताने घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 08:17 IST

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेची कोणती खाती जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

- यदु जोशीमुंबई: अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्या अशी मागणी करत भाजपावर दबाव आणणाऱ्या शिवसेनेनं अखेर नरमाईची भूमिका घेतली आहे. भाजपाकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली आहे. सध्या शिवसेनेचे सहा कॅबिनेट, तर सात राज्यमंत्री आहेत. त्यात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद वाढवून देत शिवसेनेला एकूण 16 मंत्रिपदं दिली जातील. मात्र त्याचवेळी सध्या शिवसेनेकडे असलेली दोन खाती भाजपकडे जाणार आहेत. त्यामुळे भाजपा शिवसेनेकडून कोणती खाती घेणार याकडे लक्ष लागलं आहे. पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा विषय निकाली काढला. याचवेळी भाजपाकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 जागांची ऑफर देण्यात आली आहे. मात्र गृह, वित्त, नगरविकास आणि महसूल यापैकी कोणतंही खातं शिवसेनेला दिलं जाणार नाही. याचवेळी जलसंपदा, कृषी, ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी दोन खाती देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. मात्र ती देताना सध्या शिवसेनेकडे असलेली दोन खाती भाजपकडे जातील.Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण...सध्या शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, परिवहन, उद्योग, जलसंधारण, रोजगार हमी अशी सहा कॅबिनेट मंत्रिपदं आहेत. याशिवाय शिवसेनेकडे सात राज्यमंत्रिपदंही आहेत. म्हणजेच शिवसेनेकडे एकूण 13 मंत्रिपदं आहेत. मात्र फडणवीस-2 मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिकची 3 मंत्रिपदं मिळू शकतात. विशेष म्हणजे यात उपमुख्यमंत्रिपदाचादेखील समावेश आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्यास उत्सुक आहेत. आदित्य उपमुख्यमंत्री झाल्यास दोन्ही पक्षांचा सत्तेतील समन्वय अधिक चांगला होईल, असं त्यांना वाटतं.Exclusive: भाजपकडून सेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांंची ऑफर; 2 दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा...नव्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला किती खाती?राज्य मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांसह ४३ राहू शकते. भाजपच्या ऑफरनुसार शिवसेनेला १६ मंत्रिपदे दिल्यानंतर भाजपकडे २७ मंत्रिपदं उरतात. त्यातील चार ही भाजपच्या लहान मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजपचे २३, शिवसेनेचे १६ आणि लहान पक्षांचे चार मंत्री होतील. सध्या शिवसेनेचे १३ (राज्यमंत्र्यांसह) मंत्री आहेत. भाजपकडून सहा ते सात मंत्रिपदं तर शिवसेनेकडून तीन मंत्रिपदे रिक्त ठेवली जातील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेSubhash Desaiसुभाष देसाई