शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'ते' वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारू शकणार नाही; चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 07:43 IST

Maharashtra Election Result 2019: कोल्हापूरबद्दलच्या विधानामुळे पाटील सोशल मीडियावर ट्रोल

कोल्हापूर: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या पत्रकार परिषदेतल्या कथित विधानामुळे चर्चेत आले आहेत. कोल्हापूरबद्दल केलेल्या विधानावरून रान उठल्यानंतर पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत मी व्हॉट्स अ‍पवर आलेला मेसेज वाचून दाखवला. त्यातल्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारं वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही, असं पाटील यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची कोल्हापुरात धूळधाण झाली. जिल्ह्यातले भाजपाचे दोन्ही आमदार पराभूत झाले. तर शिवसेनेलादेखील मोठा फटका बसला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या होमग्राऊंडवर महायुतीचा आणि विशेषत: त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाल्यानं सध्या चिंतन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक व्हॉट्स अ‍प मेसेज वाचून दाखवला. त्यात भाजपानं गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी होती. 'सगळं जग सुधारेल, पण कोल्हापूर सुधारणार नाही,' या वाक्यानं मेसेजचा शेवट झाला. याच वाक्यामुळे पाटील सोशल मीडियावर ट्रोल झाले.यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून पत्रकार परिषदेतल्या व्हॉट्स अ‍प मेसेज आणि त्यातल्या शेवटच्या ओळीबद्दल स्पष्टीकरण दिलं. 'गेल्या ५ वर्षात काय करायचं राहिलं, हे आम्ही जनतेला विचारलं आहे. मी व्हॉट्स अ‍प मेसेज पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. टोल आम्ही घालवला, विमानतळ सुरु केलं. मी त्या मेसेजमधले सकारात्मक मुद्दे मांडले. त्या मेसेजच्या शेवटी जे वाक्य होतं, त्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल विश्वास आहे. शेवटच्या वाक्यावरुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कोल्हापूरच्या जनतेचा उपमर्द करणारं वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारु शकणार नाही,' 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना