शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 14:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा निकालावर वकील असीम सरोदे यांनी शंका व्यक्त केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी महायुतीने २३३ जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४७ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने १४९ जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी १३२ जागांवर विजयाचा झेंडा फडकवला. या निकालावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वकील असीम सरोदे यांनीही या निकालावर शंका व्यक्त केली आहे. 

"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर वकील असीम सरोदे यांनी शंका व्यक्त केली आहे. वकील सरोदे यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. असीम सरोदे म्हणाले, हा निकाल पूर्ण अनाकलनीय आणि अविश्वसनीय अशा स्वरुपाचा आहे. महाराष्ट्रातील लोक एवढा राक्षसी बहुमत चित्र नव्हत असं बोलत आहेत. तरीसुद्धा मत मिळाली आहेत, त्यामुळेच अविश्वसनीय आहेत. आता मतदान जेव्हा आम्ही करतो तेव्हा मत दिल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण झाली असं नाही. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर जे मत मी दिलं ते मत तिथंपर्यंत पोहोचले का? मी दिलेलं मत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता हे सगळं शंकास्पद वाटत आहे. लोक  कोणाला मतदान देत आहेत आणि कोणाला ते मिळत आहेत. याची शंका लोकांना वाटत आहेत. याबद्दलच्या साशंकता लोकांनी व्यक्त केल्या आहेत. प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या नसतील तर त्या निवडणुकांना आव्हान दिले पाहिजे, असंही असीम सरोदे म्हणाले.

विधानसभेच्या पराभवावर पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आपल्या पक्षाचा पराभव धक्कादायक असल्याचे सांगितले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव असल्याचे म्हटले आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेने ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित केले, तर ध्रुवीकरणामुळे राज्याच्या शहरी भागात विरोधी महाविकास आघाडीच्या संभाव्यतेला धक्का बसला. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. यावर बोलताना  चव्हाण म्हणाले की, लाट होती की छेडछाड हे सांगणे कठीण आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Asim Sarodeअसिम सराेदेBJPभाजपाElectionनिवडणूक 2024