शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आज आपल्याकडे न्याय मागायला..." प्रचार संपण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:16 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा आजपासून थांबणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी गेल्या काही दिवसापासून सुरू आहे, आजपासून प्रचारसभा थंडावणार आहे. याआधीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदारांसाठी खास संदेश दिला आहे. शिवसेनेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, या व्हिडीओत ठाकरे यांनी मतदारांना साद घातली आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. या सभांमधून ठाकरेंनी महायुती सरकारविरोधात टीका केली. आजपासून राज्यातील प्रचारसभा थांबणार आहेत, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदानापूर्वी एक व्हिडीओ संदेश शेअर केला आहे. 

उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश

"आज मी आपल्याकडे न्याय मागायला आलो आहे. गेल्या अडीच वर्षापूर्वी आपलं सरकार चाललं होतं, ते कोणत्या पद्धतीने पाडण्यात आले. अडीच वर्षे झालीत आपण न्याय मागत आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही. न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल तर मी आता आपल्या न्यायालयात न्याय मागायला आलो आहे. दिवसाढवळ्या यांनी आपला पक्ष चोरला. हे सगळं चोरलं तरी देखील आपल्या आशिर्वादामुळेच मी ठाम उभा आहे. या लोकांनी सगळं चोरलं असलं तरी आपलं प्रेम ते चोरु शकलेले नाहीत, असंही ठाकरे म्हणाले. 

"तुमचा विश्वास आणि प्रेम या एकाच गोष्टीवरती मी बेबंदशाहीविरुद्ध लोकशाहीची लढाई लढत आहे. त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत. ही लढाई मला काही हव आहे म्हणून नाही, या देशातील नोकशाही टीकवण्यासाठी मला तुमची सोबत हवी आहे. या लढाईमध्ये केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्राला लुटायचं काम सुरु आहे, आपण ते आपल्या डोळ्यादेखत होऊ द्यायचे का? हे मला तरी नाही पटल, म्हणून आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह उतरा. आपण तिथे असाल तिथे जिद्दीने मतदानासाठी उतरलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक 2024Shiv Senaशिवसेना