शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:04 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महायुतीतील नेत्यांकडूनही मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मात्र, सर्वांच्या मनातील या प्रश्नाला आता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने बंपर कौल दिला आहे. राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थानप होताना दिसत आहे. दरम्यान, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडला आहे. अनेक जण आपापल्या इच्छाही व्यक्त करू लागले आहेत. यातच, महायुतीतील नेत्यांकडूनही मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मात्र, सर्वांच्या मनातील या प्रश्नाला आता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच उत्तर दिले आहे. ते पत्रकारांशी  बोलत होते.

मुख्यमत्रीपदासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "यासंदर्भात (मुख्यमंत्री पदासंदर्भात) अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, मुख्यमत्रीपद हे कुठल्याही निकशावर नाही, तर मुख्यमंत्रीपद हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील. एकनाथराव शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजित दादा  त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना आमचे पार्लमेटरी बोर्ड नियुक्त करते. ते बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. कुठलाही वाद नाहीये, कुठलाही विवाद नाहीये.

 

बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>

खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाकडे? -यावेळी, खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "मला असे वाटते की लोकांनी आपला मँडेट दिला आहे. लोकांनी एकनाथ शिंदे यांना खऱ्या शिवसेनेच्या रुपात स्वीकारले आहे.  हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे. तीची वैधता ही एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. तसेच, जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तिची वैधता अजित पवार यांना मिळाली आहे."

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती