शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 23:10 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. तसेच त्यांचे व्होट शेअरिंगदेखील 17 टक्क्यांच्या जवळपास होते. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अति प्रचंड बहुमत मिळाले आहेत. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागला आहे. या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच समधान मानावे लागले  आहे. 

गेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. तसेच त्यांचे व्होट शेअरिंगदेखील 17 टक्क्यांच्या जवळपास होते. 

शरद पवार गटातील हे नेते झाले विजयी - 1. मुंब्रा विधानसभा : या जागेवर जितेंद्र आव्हाड विजयी  झाले आहेत. त्यांनी 96 हजारहून अधिक मतांनी अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांचा पराभव केला.

2. वडगांव शेरी विधानसभा: येथे बापूसाहेब तुकाराम पठारे यांचा विजय झाला आहे. त्यांनी 4710 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला.

3. करजत जमखेड : येथे रोहित पवार यांचा विजय झाला आहे. त्यांनी. त्यांनी भाजपचे प्रध्यापक राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव  केला.

4. बीड : संदीप रविंद्र क्षीरसागर यांचा विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांचा 5324 मतांनी पराभव केला.

5. करमाळा : येथे नारायण गोविंदराव पाटील यांचा विजय जाला. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या दिग्विजय बागल यांचा पराभव केला. बागल येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

6. माढा : अभिजीत पाटील यांचा विजय झाला. त्यांनी अजित पवार गटाच्या मीनलताई साठे यांचा पराभव केला. साठे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या दोघांमध्ये विजयाचे अंतर 1 लाख 20 हजार एवढे होते.

7. मोहोल : येथे खरे राजू ज्ञानू यांचा विजय झाला. त्यांनी अजित पवार गटाचे माणे यशवंत विठ्ठल यांचा 30 हजार हून अधिक मतांनी पराभव केला.

8. माळशिरस - शरद पवार गटाचे उत्तमराव शिवदास जानकार यांनी विजय मिळवला. त्यांनी 13 हजारहून अधिक मतांनी भाजपचे राम विठ्ठल यांचा पराभव केला.

9. इस्लामपूर - येथून जयंत राजाराम पाटील यांचा विजय झाला. त्यांनी एनसीपी अजित पवार गटाचे नेते निशिकांत प्रकाश भोसले पाटील यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला.

10. तासगांव : येथून रोहित पाटील यांचा विजय झाला. त्यांनी संजयकाका पाटील यांचा 27 हजार हून अधिक मतांनी पराभव केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस