शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: निकालाची आकडेवारी बोलते...; शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हाचा पुन्हा बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 09:51 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: लोकसभेनंतर विधानसभेतही काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांमुळे झाले मतविभाजन

दीपक भातुसेमुंबई : लोकसभा निवडणुकीत तुतारीशी साधर्म्य असलेल्या ट्रम्पेटच्या चिन्हामुळे शरद पवार गटाला सातारा लोकसभेची जागा गमवावी लागली होती. तर, इतर लोकसभा मतदारसंघात अनोळखी उमेदवार असूनही ट्रम्पेट चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला हजारो मते मिळाली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघांत झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय हा या ट्रम्पेट चिन्हामुळे शक्य झाला, असे आकडेवारीवरून म्हणता येऊ शकते.

इतर अपक्षांमुळे नुकसान

अकोले (जि. अहिल्यानगर) मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी ५,५५६ मतांनी पराभव केला. इथे अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांनी तब्बल ३२,७८३ मते घेतली. शेवगाव (जि. अहिल्यानगर) मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळेल यांनी शरद पवार गटाचे उमेदवार ॲड. प्रतापराव ढाकणे यांचा १९,०४३ मतांनी पराभव केला. इथे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी ४१,७८७ मते घेतली. माजलगाव (जि. बीड) मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा ५,८९९ मतांनी पराभव केला. इथे अपक्ष उमेदवार रमेश अडसकर यांनी ३८,९८१ मते घेतली आहेत.

ट्रम्पेटचा कुठे बसला फटका?

जिंतूर (परभणी)     विजय भांबळे     ४,५१६     ७,४३०     मेघना बोर्डिकर (भाजप)घनसावंगी (जालना)     राजेश टोपे     २,३०९     ४,८३०     हिकमत उढाण (शिंदेसेना)शहापूर (ठाणे)     पांडुरंग बरोरा     १,६७२     ३,८९२     दौलत दरोडा (अ.प.गट)बेलापूर (ठाणे)    संदीप नाईक    ३७७    २८६०    मंदा म्हात्रे (भाजप)    अणुशक्तीनगर (मुंबई)     फाहद अहमद     ३,३७८     ४,०७५    सना मलिक (अ.प.गट)आंबेगाव (पुणे)     देवदत्त निकम     १,५२३     २,९६५    दिलीप वळसे पाटील (अ.प.गट)पारनेर (अहिल्यानगर)    राणी लंके    १,५२६     ३,५८२     काशीनाथ दाते (अ.प.गट)केज (बीड)     पृथ्वीराज साठे     २,६८७     ३,५५९     नमीता मुंदडा (भाजप)परांडा (धाराशिव)    राहुल मोटे    १५०९    ४४४६    तानाजी सावंत (शिंदेसेना)

वंचितचाही बसला फटका

नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम यांनी शरद पवार गटाचे प्रदीप नाईक यांचा ५,६३६ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावर उभे असलेले अशोक ढोले यांनी ५,३११ मते घेतली, तर वंचितने ४,५१५ मते घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बंब यांनी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा ५,०१५ मतांनी पराभव केला. इथे ट्रम्पेट चिन्हावरील उमेदवाराने ३,४६७ तर वंचितने ८,८३९ मते घेतली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNCPराष्ट्रवादी काँग्रेस