शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 10:16 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत होते.

दीपक भातुसेमुंबई - विधानसभा निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना ५१ मतदारसंघांत आमनेसामने होते. यातील ५६ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत एकनाथ शिंदेंनी बाजी मारली आहे. ५१ पैकी केवळ १४ मतदारसंघांत उद्धवसेनेला यश मिळाले आहे, तर शिंदेसेनेचे ३६ मतदारसंघांत उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका मतदारसंघात दोन सेनेच्या लढतीत शेकापने बाजी मारली आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदेंचे मनोबल वाढले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत होते. विधानसभेच्या निकालानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खरे वारसदार आपणच असल्यावर शिक्कामोर्बत झाल्याची प्रतिक्रिया या निकालावर बोलताना एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

सहा विद्यमान आमदारांचा लढाईत झाला पराभव शिंदे विरुद्ध ठाकरे लढाईत उद्धवसेनेच्या सहा विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. या पराभूत आमदारांमध्ये रमेश कोरगावकर (भांडुप पश्चिम), ऋतुजा लटकरे (अंधेरी पूर्व), प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी (राजापूर), वैभव नाईक (कुडाळ), शंकरराव गडाख (नेवासा). शिंदेसेनेच्या चार विद्यमान आमदारांना पराभवाचा फटका बसला आहे. यात मनीषा वायकर (आमदार आणि विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी, जोगेश्वरी पूर्व), सदा सरवणकर (माहिम), यामिनी जाधव (भायखळा), ज्ञानराज चौगुले (उमरगा) यांचा समावेश आहे.

शिंदेसेना विजयी उमेदवार

चोपडा - चंद्रकांत सोनावणे, पाचोरा - किशोर पाटील, मागाठाणे - प्रकाश सुर्वे, भांडुप (पश्चिम) - अशोक पाटील, अंधेरी (पूर्व) - मुरजी पटेल, चेंबुर - तुकाराम काते, कुर्ला- मंगेश कुडाळकर, कर्जत-महेंद्र थोरवे, महाड-भरतशेठ गोगावले, रत्नागिरी-उदय सामंत, राजापूर- किरण सामंत, दापोली-योगेश कदम, कुडाळ- नीलेश राणे, सावंतवाडी-दीपक केसरकर, पालघर- राजेंद्र गावित, बोईसर- विलास तरे, भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे, कल्याण (पश्चिम) -विश्वनाथ भोईर, अंबरनाथ-डॉ. बालाजी किणीकर, कल्याण ग्रामीण-राजेश मोरे, ओवळा-माजीवडा-प्रताप सरनाईक, कोपरी-पाचपखाडी-एकनाथ शिंदे, राधानगरी-प्रकाश आबिटकर, पाटण-शंभूराजे देसाई, नेवासा- विठ्ठल लंघे, नांदगाव-सुहास कांदे, मालेगाव बाह्य- दादाजी भुसे, कन्नड- रजनीताई जाधव, औरंंगाबाद (मध्य) - प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद (पश्चिम) - संजय शिरसाट, वैजापूर-रमेश बोरणे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, पैठण- विलास भुमरे, बुलडाणा- संजय गायकवाड, कळमनुरी- संतोष बांगर, रामटेक- आशिष जयस्वाल

उद्धवसेना विजयी उमेदवार

विक्रोळी - सुनील राऊत, जोगेश्वरी (पूर्व) - अनंत नर, दिंडोशी- सुनील प्रभू, माहिम- महेश सावंत, वरळी-आदित्य ठाकरे, भायखळा-मनोज जामसुतकर, गुहागर-भास्कर जाधव, बार्शी-दिलीप सोपल, उमरगा-प्रवीण स्वामी, उस्मानाबाद -कैलास पाटील, परभणी- डॉ. राहुल पाटील, मेहकर-सिद्धार्थ खरात, दर्यापूर-गजानन लवाटे, बाळापूर-नितीन देशमुख.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे