शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 07:22 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: शरद पवार यांनी परळीत सभा घेऊन गुंडगिरी संपविण्याचे आवाहन करुनही मुंडे यांनी सुमारे सव्वा लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.  एमआयएमचे इम्तियाज जलील हे  विधानसभेतही पराभूत झाले.  

नंदकिशोर पाटील छत्रपती संभाजीनगर: लाडक्या बहिणींनी दिलेली साथ, भाजपचे मायक्रोप्लॅनिंग आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे झालेले ध्रुवीकरण यामुळे मराठवाड्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत  महाविकास आघाडीची धूळधाळ उडवली. ४६ मतदारसंघापैकी तब्बल ४१ जागा मिळवत मराठवाड्याने राज्यात  महायुतीची सत्ता आणण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लावला आहे. लोकसभेला महायुतीच्या विरोधात चाललेला जरांगे फॅक्टरही यावेळी पूर्णपणे निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे.   

मराठवाड्यात महाविकास आघाडी महायुतीला जोरदार लढत देईल, अशी चर्चा होती. मात्र मतदारांनी महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारले आहे. महायुतीमध्ये २० जागा लढविणाऱ्या भाजपने १९ जागा मिळवत आपला प्रभाव सिध्द केला आहे. शिंदेसेनेने १६ जागा लढवत १३ जागांवर विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ९ जागा लढवत अनपेक्षितपणे ८ जागा खेचून आणल्या आहेत.  महायुतीचे धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, तानाजी सावंत आणि संजय बनसोडे हे पाच मंत्री विजयी झाले.  यातच धनंजय मुंडे यांनी सुमारे सव्वा लाखांच्या फरकाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिध्द केले आहे.  शरद पवार यांनी परळीत सभा घेऊन गुंडगिरी संपविण्याचे आवाहन करुनही मुंडे यांनी सुमारे सव्वा लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.  एमआयएमचे इम्तियाज जलील हे  विधानसभेतही पराभूत झाले.  

पत्नीची पतीवर मात 

कन्नड मतदारसंघात शिंदेसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांनी त्यांचे पती अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर मात केली. हर्षवर्धन जाधव हे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. संजना या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. 

पाच मुद्द्यांत विश्लेषण

  • लाडकी बहीण : योजनेचा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी केलेला जोरदार प्रचार
  • भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या घोषणांमुळे झालेल्या ध्रुवीकरणाचा महायुतीला मोठा लाभ झाल्याचे दिसत आहे.
  • शरद पवारांचा प्रभाव नाही : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोठा प्रभाव राहील असे चित्र असताना पक्षाला मोठे यश मिळाले नाही. जालना, बीडमध्ये पवारांना प्रभाव पाडता आला नाही.
  • लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरने महायुतीला मोठा दणका दिला होता. मात्र  विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर निष्प्रभ झाल्याचे दिसते.  
  • भाजपचे यश  : यंदाही भाजपचा स्ट्राईक रेट चांगला राहिला. 
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील