शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 10:05 IST

आरएसएसनेही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदेंनी आणल्यामुळे त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळालं असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं यासाठी शिंदेसेनेकडून दबावतंत्र वापरण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक जागा मिळवून नंबर वन ठरलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही आहेत. फडणवीसांना मुख्यमंत्री करावं ही जनतेची मागणी असून त्यांनीच राज्याचे नेतृत्व करावे अशी मागणी भाजपा आमदार करत आहेत. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. 

महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत तर भाजपाने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून इतरांसह अपक्ष ५ आमदारांनी भाजपाला पाठिबा दिला आहे. विशेषत: एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी कायम राहावे ही शिंदेसेनेच्या नेत्यांची इच्छा असली तरी फडणवीसांच्या नावाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आता दिल्लीतील वरिष्ठ ठरवणार आहेत. आरएसएसनेही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदेंनी आणल्यामुळे त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळालं असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

आगामी काळात मुंबई महापालिकेसह १४ महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या अतिशय महत्त्वाच्या असल्याने तोपर्यंत मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राहावे असा शिंदेसेनेचा आग्रह आहे. तर भाजपालाही येत्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रिपद असावे असं वाटते. जागावाटपातही भाजपाने शिंदेसेनेला कमी जागा घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र शिंदेनी ८० हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केला. भाजपाने १४८ जागांवर निवडणूक लढवली त्यात ५ जागांवर मित्रपक्षांना उमेदवारी दिली. २०२२ मध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथी अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपाने मुख्यमंत्रिपद दिले. त्यावेळीही भाजपाचे १०५ आमदार नाराज झाले होते. आताच्या निवडणुकीत भाजपाने १०५ जागांवरून १३२ जागांवर मजल मारली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रि‍पदावर दावा करत आहेत. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार