शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 21:30 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : ...यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पासून ते मंत्री राहिलेल्या नेत्यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात, महायुतीला अति प्रचंड बहुमत मिळल्याचे तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत अनेक मोठ्या आणि दिग्गज चेहऱ्यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पासून ते मंत्री राहिलेल्या नेत्यांचाही समावेश आहे.

या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...! - बाळासाहेब थोरात - या यादीत सर्वात धक्कादायक नाव म्हणजे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला. 10500 हून अधिक मतांनीत्यांचा पराभव झाला.

नवाब मलिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक यांचा शिवाजी मानखुर्द जागेवर पराभव झाला आहे. अबू आझमी यांनी त्यांचा पराभव केला. ते 30 हजारहून अधिक मतांनी पराभूत झाले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण - या यादीत माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव आहे. कराड दक्षिणमधून त्यांचा पराभव झाला. भाजपचे अतुलबाबा भोसले यांनी त्यांचा पराभव केला.

संजय काका पाटील - तासगाव कवठेमहंकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहीत पाटील यांनी पराभव केला. त्यांचा 15 हजारहून अधिक मतांनी पराभवझाला.   इम्तियाज जलील - छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद पूर्वमध्ये बाजप नेते अतुल सावे यांनी एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव केला. जलील यांचा जळवपास 2 हजार मतांनी पराभव झाला.

हर्षवर्धन पाटील - पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादी (अजित पवार)चे दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला आहे. त्यांनी माजी मंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. 19 हजार 410 पाटील यांचा पराभव झाला. 

राजेश टोपे - घनसावंगीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण यांनी राष्ट्रवादा काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री राजेश टोपे याांचा पराभव केला. बाळासाहेब पाटील - कराड उत्तरमध्ये भाजपचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील यांचा पराभव  केला आहे. पाटील यांचा 43691 मतांनी पराभव झाला.

माणिकराव ठाकरे - दिग्रसमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांनी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आहे. ठाकरे यांचा 28775 मतांनी पराभव झाला आहे. 

राम शिंदे - कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी भजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव झाला.

भावना गवळी - रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनके यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांचा पराभव केला. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या निवडणुकीत गवळी यांचा 16116 मतांनी पराभव झाला आहे. यशोमती ठाकूर - तिवसा येथे भाजपचे राजेश वानखेडे यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. ठाकरू 7617 मतांनी पराभूत झाल्या.

के सी पाडवी - अक्कल  कुवा येथे शिवसेना शिंदे गटाचे अमश्या पाडवी यांनी काँग्रेसचे के सी पाडवी यांचा पराभव केला. पाडवी 2904 मतांनी पराभूत झाले. राजन विचारे - ठाण्यात भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला. विचारे 58253 मतांनी पराभव  केला.

सदा सरवणकर - माहिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी पराभव केला. सदा सरवणकर यांचा 1316 मतांनी पराभव  झााला. 

समरजितसिंह घाटगे - कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजीत  सिंह घाटगे यांचा पराभव केला आहे. घाटगे यांचा 11581 मतांनी पराभव  झाला. 

बच्चू कडू - अचलपूरमध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चूकडू यांचा पराभव केला आहे. कडू 12131 मतांनी पराभूत झाले आहेत. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBachhu Kaduबच्चू कडू