शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 15:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के. पी. पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा, शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटात नेत्यांचे प्रवेश वाढल्याचे दिसत आहे. आज राधानगरी विधानसभा मतदारसंघातील के.पी. पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे आता राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातून प्रकाश आबिटकर तर ठाकरे गटातून के.पी. पाटील असा लढत होण्याची शक्यता आहे.

माजी आमदार के.पी. पाटील यांनी आज मुंबईतील मातोश्रीमध्ये ठाकरे गटात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. के.पी. पाटील यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे. 

राधानगरीत पुन्हा गुरु विरुद्ध चेल्यात लढत 

सरवडे :राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी मिळणार या बहुचर्चित ठरलेल्या प्रश्नाला के. पी.पाटील यांच्या उमेदवारीने पूर्णविराम मिळाला. राधानगरीत पुन्हा एकदा के.पी.पाटील गुरू विरुद्ध आमदार प्रकाश आबिटकर ह्या चेल्यात सामना होणार आहे. तर उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशी रंगतदार लढत दिसणार आहे, त्यामुळे ही लढत जिल्ह्यातून लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.

 गेले अनेक दिवस राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी मिळणार यावरच चर्चेचे गुराळ सुरू होते. अखेर निवडणुकीत लढाईत कोण उजवे ठरणार हा निकष ठेवत उमेदवारी  निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी के .पी. पाटील  यांना घडाळ्यातीत हातात  शिवबंधन बांधत आज उमेदवारी जाहीर केली. माजी मंत्री,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील ,माजी कृषी मंत्री  शरदचंद्र पवार ,माजी मंत्री जयंत पाटील आदी प्रमुख मंडळी के. पी. पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे रस्सीखेच शर्यतीत असलेले के. पी .पाटील यांचे मेहुणे ए .वाय. पाटील व अन्य मंडळी यांची भूमिका काय लवकरच स्पष्ट होईल. एकूणच काय या मतदारसंघात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच लढत होणार हे स्पष्ट झाले.

गत निवडणुकीत आठ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. यावेळी हे सगळे इच्छुक सावध झाले आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. शिंदेसेनेतून आबिटकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

या मतदारसंघात गत दोन्ही निवडणुकींत शिवसेनेतून आमदार आबिटकर हे विजयी झाले. त्यामुळे आघाडी धर्मानुसार ही जागा उद्धवसेनेकडे जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार के. पी. पाटीलए. वाय. पाटील, राहुल देसाई हे तिकिटासाठी जोडण्या लावत आहेत.  तर दुसरीकडे आज के.पी. पाटील यांनी ठाकरे गटात थेट प्रवेशच केला आहे, यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे