उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, श्रीनिवास वनगा विधानसभा लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:57 PM2019-10-01T12:57:13+5:302019-10-01T13:02:28+5:30

पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ.

maharashtra vidhan sabha 2019 : Shrinivas vanga will contest palghar assembly; Uddhav Thackeray followed the word | उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, श्रीनिवास वनगा विधानसभा लढणार!

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, श्रीनिवास वनगा विधानसभा लढणार!

Next

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिलेला शब्द पाळला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पालघर मतदार संघातून शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजप यांच्यात युती झाल्यामुळे पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे काँग्रेसमधून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वणगा कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत श्रीनिवास वनगा यांना विधानसभेत पाठविणार असल्याचे म्हटले होते. 

दरम्यान, वणगा कुटुंबियांनाही उद्धव ठाकरे हे श्रीनिवास यांना विधानसभेची उमेदवारी देऊन दिलेला शब्द पूर्ण करतील, असा विश्वास होता. तसेच, पालघर विधानसभेसाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली असता, ‘कामाला लागा’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, असे श्रीनिवास वनगा यांनी सांगितले होते. 

Maharashtra Vidhan Sabha 2019 : Shiv Sena will give ticket to Srinivas vanga in Palghar Assembly? | Vidhan Sabha 2019 : शिवसेनेची उमेदवारी श्रीनिवास वनगांना? पालघर विधानसभेसाठी वाढली इच्छुकांतील रस्सीखेच

पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या मतदार संघावर सर्वच पक्षाचे लक्ष असते. 

Web Title: maharashtra vidhan sabha 2019 : Shrinivas vanga will contest palghar assembly; Uddhav Thackeray followed the word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.