शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Vidhan Sabha 2019: शिवसेनेचा १२६ चा आग्रह; भाजप १२० जागांवर ठाम

By यदू जोशी | Updated: September 22, 2019 06:27 IST

युतीच्या जागावाटपाचा तिढा; मित्रपक्षांना १८ ऐवजी आता दहाच जागा

- यदु जोशीमुंबई : भाजप १२० पेक्षा एकही जास्त जागा शिवसेनेला सोडायला तयार नाही; तर दुसरीकडे शिवसेना १२६ वर अडून बसली आहे. अशावेळी दोन्हींचा सुवर्णमध्य काढून शिवसेनेचे समाधान केले जाऊ शकते. हा आकडा १२० ते १२६ दरम्यान असेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.विधानसभा निवडणूक जाहीर झाली तरी युतीचे घोडे अडल्याने, युती होणार की नाही याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार, युती १०० टक्के होणार असून येत्या तीन-चार दिवसांत त्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने १२० जागा लढाव्यात, आम्ही लहान मित्रपक्षांसह १६८ जागा लढवू, अशी ठाम भूमिका भाजपने शिवसेनेला कळविली आहे. मात्र शिवसेना १२६ जागांवर अडून आहे. भाजपने १६८ जागा लढवून १४५ जागा जिंकल्या तर सरकार चालविताना मग शिवसेनेला विश्वासात घेण्याची त्यांना गरज राहणार नाही, अशी शंकायुक्त भीती शिवसेनेच्या गोटात आहे.भाजप १७१ तर शिवसेना ११७ जागा असा फॉर्म्यूला ठरल्याचा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्टपणे इन्कार केला. शिवसेनेला १२०जागा देण्याची आमची सुरुवातीपासूनच तयारी आहे, असे ते म्हणाले. लहान मित्रपक्षांसाठी भाजप १८ जागा सोडणार असे आतापर्यंत म्हटले जात होते. मात्र, आता शिवसेनेला १२० जागा देताना लहान मित्रपक्षांना (रिपाइं, रासप, शिवसंग्राम, अपक्ष आदी) १८ जागा सोडण्याच्या मूडमध्ये भाजप नाही. ही संख्या १० पर्यंत खाली येऊ शकते. त्यातही बहुतेक उमेदवार हे भाजपच्या कमळ चिन्हावरच लढतील.

मुख्यमंत्र्यांनी केले मतदारांना आवाहनलोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवाची घोषणा निवडणूक आयोगाने केलेली आहे. निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. जनतेला आपले सरकार निवडून देण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. आपण सरकारकडून अनेक अपेक्षा करतो. एखाद्या निर्णयावर टीकाही करतो. अपेक्षा वा टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे पण अपेक्षा वा टीका करण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे मतदान करतात. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, २१ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात मतदान करावे आणि लोकशाहीच्या या महोत्सवाचे भाग व्हावे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा