शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
2
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
3
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
4
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
5
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
6
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
7
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
8
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
9
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
10
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
11
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
12
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
13
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
14
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
15
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
16
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
17
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
18
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
19
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
20
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा

Vidhan Sabha 2019 : एमआयएम नसली तरी चिंता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:49 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर युती राहील की नाही, हे अद्याप अनिर्णित आहे.

कल्याण : विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर युती राहील की नाही, हे अद्याप अनिर्णित आहे. मात्र युती झाली नाही तरी, वंचित आघाडीला फारसा फरक पडणार नसल्याचा दावा वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी कल्याणमध्ये केले. महिला कार्यकारिणी गठीत करण्यासाठी त्यांनी मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी लोकमतशी बोलताना एमआयएमच्या युतीबाबत त्यांनी भाष्य केले.लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे अध्यक्ष अकरूबुद्दीन ओवेसी यांची चांगली साथ लाभली. पण मुस्लिम समाजाचे मतविभाजन झाल्याने एमआयएमचे संघटन त्या निवडणुकीत दिसून आले नाही. त्या निवडणुकीत मोठा भार वंचित आघाडीनेच उचलला होता. त्यामुळे एमआयएमशी विधानसभा निवडणुकीत युती नाही झाली तरी, वंचितला फारसा फरक पडणार नाही, असे ठाकूर म्हणाल्या. महत्वाचे म्हणजे, मुस्लिम समाजात जे घटक आहेत, त्यांचा कल वंचित आघाडीकडे आहे. त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या २८८ पैकी २५ उमेदवार मुस्लिम समाजातील असतील, हे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. महिला आघाडीची कार्यकारिणी गठन करण्यासाठी ठिकठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत. सर्व समाजातील लोकांना आघाडीत घेतले जाणार आहे. उच्चशिक्षित आणि राजकीय समज असलेले कार्यकर्ते आघाडीत असावेत, यावर आमचा भर असून, या माध्यमातून लढाऊ राजकीय संघटन उभे करण्याचा आघाडीचा प्रयत्न असल्याचेही ठाकूर म्हणाल्या. यावेळी ठाकूर यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सदस्या रोहीणी ठेकळे होत्या. धर्मा वक्ते, रूपेश हुंबरे, प्रतिक साबळे, रविंद्र संगारे आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.>बाळासह उपस्थितकल्याणमधील शासकीय विश्रामगृहात कार्यकारिणीसाठी शेकडोहून अधिक महिलांनी मुलाखती दिल्या. एकेकाळच्या काँग्रेसमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या व सध्या वंचित आघाडीत असलेल्या शारदा बागुल यांनीही मुलाखत दिली. विशेष म्हणजे उल्हासनगरमधील प्रिया पेठारे या सात दिवसांच्या बाळाला घेऊन मुलाखतीसाठी आल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी