शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : जळगावमध्ये ११ जागांसाठी शिवसेनेचे ४३ जण इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 04:46 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याचा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.

जळगाव : विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याचा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. जिल्ह्यातील ११ जागांसाठी शिवसेनेच्यावतीने ४३ जण इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई येथील शिवसेना भवनात राज्यातील २८८ मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. १७ व १८ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्टÑातील इच्छुकांच्या मुलाखती होतील. जळगाव लोकसभा मतदार संघात येणाºया सहा विधानसभा मतदार संघातील इच्छुकांची यादी ‘लोकमत’ ला प्राप्त झाली आहे. यात चाळीसगावला पप्पू गुंजाळ , महेंद्र पाटील, रमेश चव्हाण, एरंडोला माजी आमदार चिमणराव पाटील, जि.प.सदस्य डॉ. हर्षल माने, जळगाव शहरासाठी माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर सुनील महाजन यांची नावे आहेत. जळगाव ग्रामीणसाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तर पाचोरा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार किशोर पाटील यांचे एकमेव नाव आहे. अमळनेर मतदारसंघासाठी जिल्हा बँक संचालक व राष्टÑवादीचे पदाधिकारी अनिल भाईदास पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहे. शिवसेनेकडून त्यांचे नाव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019