शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: भाजप २० टक्के आमदारांना देणार नारळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:52 IST

१२२ आमदारांपैकी २२-२५ जणांना पुन्हा संधी मिळू शकणार नाही.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात सत्तेवर असलेला भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत किमान २० ते ३० टक्के विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारू शकतो.महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटांवर जिंकून आलेल्या १२२ आमदारांपैकी २२-२५ जणांना पुन्हा संधी मिळू शकणार नाही. गेल्या एक वर्षात भाजपने तीन अंतर्गत सर्व्हे केले त्यातून हा निष्कर्ष निघाली की नव्या चेहऱ्यांना लोकांसमोर आणले पाहिजे.भाजपचे महाराष्ट्रातील प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भुपेंद्र यादव हे कठोरपणे काम करणारे व कसबी नेते आहेत. पक्षाने जवळपास सगळ्याच जागा जिंकल्या पाहिजेत, असे त्यांना वाटते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच राज्यातील नेत्यांना पक्षाने १५० जागा जिंकण्याच्या (भाजप १६२ जागा लढवण्याची शक्यता आहे) परिस्थितीत असले पाहिजे, असे सांगितले आहे. तरीही भाजप १४४ जागा लढवण्याची शक्यता दिसते. छोट्या पक्षांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढावे अशी भाजपची इच्छा असून तशी तयारी नसेल तर ते त्यांच्या मार्गाने जाण्यास मोकळे असल्याचे भाजपच्या पदाधिकाºयाने सांगितले. विविध संस्थांमार्फत तीन सर्वेक्षण करण्यात आले, तर थेट भूपेंद्र यादव यांच्या निगराणीत एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना उमेदवारी दिली जावी, असे मत या व्यक्त करण्यात आले.हरियाणा विधानसभेची निवडणूक भाजप एकटा लढणार आहे. गेल्यावेळी ९० जागांपैकी भाजपचे ४७ आमदार निवडून आले होते. सद्य: राजकीय स्थिती बघता हरियाणात विरोधक विखुरलेले आहेत; त्यामुळे भाजप अंतर्गत मूल्यांकन आणि सर्वेक्षणाच्या आधारे किमान १५ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्याची दाट शक्यता आहे.29 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतणार असून त्याचदिवशी होणाºया भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उमेदवारांची यादी घोषित केली जाईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा