शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचं बिगुल, विधान परिषदेच्या पाच जागांसाठी या तारखेला होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:53 IST

Maharashtra Vidhan Parishad Election Schedule: विधानसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने होत नाहीत तोच राज्यामध्ये आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभेच्या निवडणुका होऊन सहा महिने होत नाहीत तोच राज्यामध्ये आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या.  या पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या आहे.

विधान परिषदेच्या या पाच जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीचा कार्यक्रम थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १७ मार्च असेल. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २० मार्च असेल. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी  पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मात्र आता काही महिन्यांतच होत असलेल्या या विधान परिषदेच्या निवडणुकीत पैकीच्या पैकी जागांवर यश मिळवून दबदबा कायम राखण्याचं आव्हान महायुतीसमोर असणार आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक 2024