शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, राज्यात 5 लाख 97 हजार कोटींचे प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:42 IST

पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. राज्यात  1 हजार 97 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 5 लाख 97 हजार 319 कोटी इतकी आहे.

नवी दिल्ली, दि. 19 - पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. राज्यात  1 हजार 97 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 5 लाख 97 हजार 319 कोटी इतकी आहे. देशातील सर्व राज्यांची 30 एप्रिल 2017 पर्यंतची पायाभूत सुविधा प्रकल्पांची स्थिती दर्शविणारी पुस्तिका निती आयोगाने तयार केली असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.निती आयोगाने जाहिर केलेल्या या अहवालात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प (पी.पी.पी.) व शासकीय प्रकल्पांचा यात समावेश आहे. 5 ते 50 कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश निती आयोगाने आपल्या अहवालात केला आहे.देशात एकूण 8 हजार 367 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 50 लाख 58 हजार 722 कोटी इतकी आहे. देशातील या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमती मध्ये महाराष्ट्राचा सहभाग हा सर्वात जास्त म्हणजे 11.8 टक्के इतका आहे.महाराष्ट्रापाठोपाठ दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य असून, या राज्यात 454 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 3 लाख 54 हजार 419 कोटी इतकी आहे, देशातील एकूण प्रकल्प किमतीच्या 7 टक्के वाटा उत्तर प्रदेशाचा आहे. अरूणाचल प्रदेशाचा क्रमांक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तिसरा असून या राज्यात 188 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 3 लाख 17 हजार 310 कोटी इतकी आहे, तर या राज्याचा वाटा देशाच्या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमतीत 6.3 टक्के इतका आहे.तमिळनाडू चौथ्या क्रमांकावर तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तमिळनाडूचा वाटा हा 6.2 टक्के तर गुजरातचा वाटा 5.7 टक्के इतका आहे. या राज्यांच्या खालोखाल कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगाणा, बिहार, राजस्थान आदी राज्यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस