महाराष्ट्र हे युवाशक्ती असलेले राज्य -फडणवीस
By Admin | Updated: December 22, 2014 03:31 IST2014-12-22T03:31:06+5:302014-12-22T03:31:06+5:30
महाराष्ट्रातील युवकांचे सरासरी वय सत्तावीस वर्षे आहे. या युवाशक्तीला चांगली साथ मिळाल्यास युवक नक्कीच प्रगती करतील

महाराष्ट्र हे युवाशक्ती असलेले राज्य -फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रातील युवकांचे सरासरी वय सत्तावीस वर्षे आहे. या युवाशक्तीला चांगली साथ मिळाल्यास युवक नक्कीच प्रगती करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंधराव्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. हा महोत्सव २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणार आहे.
पार्ले महोत्सव देशभर प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी पार्ल्यात आलो तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतो, यंदा मुख्यमंत्री झालो. पण यापुढे आपणास कोणतेही पद नको असून पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून आपणास ठेवावे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. या कार्यक्रमास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर खास उपस्थिती होती. देशाचे रक्षण होईल असे कार्य सतत करत राहू, अशी ग्वाही देखील पर्रिकर यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)