शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

अवघे पाऊणशे वयोमान; लालपरी झाली ७५ वर्षांची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 10:12 IST

महाराष्ट्राची जनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लालपरीने अनेक उन्हाळे पावसाळे अन् अनेक चढउतार पाहिले.

बाळासाहेब बोचरे मुंबई : महाराष्ट्राची जनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लालपरीने अनेक उन्हाळे पावसाळे अन् अनेक चढउतार पाहिले. वाढलेला तोटा पाहता मधल्या दहा वर्षांत ही परी आपला संसार गुंडाळते की काय असे वाटत असताना आपली लालपरी आता रुपडं बदलू लागली आहे. वयाची पंचाहत्तरी ओलांडली, वय वाढलं तरी नव्या जोमाने धावू लागली आहे. प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागली असून डिझेल ते इलेक्ट्रिक बसपर्यंत तिने मजल मारली आहे. हिच्यामध्ये बसून आरामदायी गारेगार प्रवास हवाहवासा वाटू लागला आहे. 

१ जून १९४८ रोजी अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावलेल्या पहिल्या बसचे कंडक्टर लक्ष्मण केवटे यांचे नुकतेच निधन झाले. सुरुवातीला बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन नावाने ही बस चालली.  त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर  १९६० पासून तिचे नामांतर.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे झाले. बेडफोर्ड कंपनीच्या केवळ ३६ बसच्या ताफ्यासह या महामंडळाची सुरुवात झाली.आज सर्व मिळून बसची संख्या १८ हजारांपर्यंत गेली आहे. कालांतराने टाटा आणि लेलॅँड कंपनीच्या बस महामंडळात आल्या. केवळ निवडक मार्गावरच या बस धावत असल्याने एखाद्या गावात एसटी बस असली तरी ती एक नवलाई होती. लाल आणि पांढरा पट्टा मारलेली ही बस जेव्हा झाडीतून धावायची तेव्हा वाघीण धावल्याचा भास व्हायचा. 

एशियाडची क्रेझ१९८२ साली पुण्यामध्ये आशियायी स्पर्धा भरवल्या गेल्या. त्यावेळी बालेवाडी ते पुणे खेळाडूंना ने-आण करण्यासाठी हिरव्या पांढऱ्या रंगाच्या विशेष आरामदायी बस महामंडळास सुपूर्द करण्यात आल्या. म्हणून या बसची एशियाड बस म्हणूनच ओळख झाली. स्पर्धा संपल्यानंतर त्या बस विशेष सेवा देणाऱ्या बस म्हणून दिमाखात मिरवू लागल्या. १९८२ नंतर महामंडळाने २० वर्षांनी स्वत:च्या मालकीच्या तशा बस बांधल्या. कालांतराने या बसला हिरकणी असे नाव दिले. या गाडीला जांभळा व पांढरा असा रंग देण्यात आला. 

शिवशाही आली : १०१४ साली महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप सरकारच्या काळात एसटी बसला ऐतिहासिक नावे देण्यात आली. परिवर्तन (लालपरी), हिरकणी, यशवंती (मिडीबस) या बसनंतर शिवशाही आणि शिवनेरी आणि अश्वमेध या आरामदायी आणि वातानुकूलित व स्लीपर बस महामंडळाच्या ताफ्यात आणल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र