शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:45 IST

MSRTC Income: एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत सरासरी २० लाख रुपयांनी घट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात दीड हजार नवीन बस दाखल झाल्या असल्या तरी यंदा एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत सरासरी २० लाख रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. तिकीट भाडेवाढ, अस्वच्छ आगार, वेळेवर सेवा नसणे अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

दरवर्षी एप्रिल ते जून हा कालावधी एसटीसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. लग्नसराई आणि शाळा-कॉलेजना असलेल्या सुट्ट्यांमुळे ग्रामीण, तसेच शहरी भागांत एसटीचे प्रवासी वाढतात. मात्र, यंदा या गर्दीच्या तीनही महिन्यांमध्ये प्रवासी संख्या सरासरी २० लाखांनी घटली आहे. २४ जानेवारी २०२५  रोजी एसटीचे तिकीट भाडे १५ टक्क्यांनी वाढवण्यात आले. 

भाडेवाढीनंतर उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा होती; पण एप्रिलमध्ये ८.५ टक्के, मे महिन्यात १२.६ टक्के आणि १५ जूनपर्यंत केवळ १२.५ टक्के वाढ नोंदवली गेली. भाडेवाढीमुळे काही प्रमाणात उत्पन्न वाढले असले, तरी ते अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत कमी आहे. 

तज्ज्ञांचे म्हणणे काय?एसटीचे ३१ विभाग व २५१ आगारांपैकी अनेक भाग तोट्यात आहेत. ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर हे मोठे विभाग सातत्याने तोट्यात असून, ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. नफ्यात असलेल्या विभागांचे योगदानही एकूण आर्थिक स्थिती सुधारण्यात अपुरे पडत आहे. तोट्यातील आगारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली जाते; पण कौशल्य विकास, समुपदेशन किंवा कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी, वाढीव भाडेवाढीचे फायदेही एसटीला मिळताना दिसत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्र