शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला पुन्हा वळवाचा तडाखा, गारपीट, वादळी वाऱ्याने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 06:50 IST

पुढील दाेन दिवस पावसाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वादळी वारा व विजांच्या कडकडाटात शुक्रवारी झालेल्या वळवाच्या पावसाने राज्याला झोडपले असून वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यात ३५ जनावरे दगावले असून आंबा, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान आणि पशुधन दगावल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा वादळी वाऱ्याने उरली-सुरली पिके मातीत गेली आहेत.

शुक्रवारी सकाळपासून राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटात अनेक भागांत गारपीट आणि जोरदार पाऊस झाला.

भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू- बुलढाण्यातील काटेल धाम (ता. संग्रामपूर) येथे भिंत कोसळून कृष्णाली बोरकर या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

विदर्भात मोठे नुकसान- पश्चिम विदर्भात वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला, फळपिके व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू- वीज पडल्याने बुलढाण्यातील चितोडा (ता. खामगाव) येथे गोपाल महादेव कवळे (वय ४०), कोल्हापुरात मौजे रेठरे (ता. शाहूवाडी) येथे बाबूराब दादू जाधव (६१) यांचा मृत्यू झाला.

आंब्याचे नुकसान- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. सांगलीतील शिराळा तालुका, कोल्हापूरमधील करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुका, सातारा जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची हजेरी होती.

राज्यात ३५ जनावरे ठार- अकोल्यातील माझोड येथे गारांच्या तडाख्याने दहा शेळ्या दगावल्या. यात पळशी खुर्द (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथे आठ शेळ्या, सोंडी (ता. सेलू, जि. वर्धा) येथे बैल, पेढी आणि संगम (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे एक गाय, दोन बैल  ठार झाले. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी