महाराष्ट्र म्हणतोय, एक किंवा दोनच बस्स!

By Admin | Updated: August 19, 2014 11:11 IST2014-08-19T11:10:22+5:302014-08-19T11:11:18+5:30

वाढत्या लोकसंख्येबाबत झालेली जनजागृती, कुटुंबाचा वाढता खर्च अशा विविध कारणांमुळे राज्यात एक किंवा दोन अपत्यांवर समाधान मानणार्‍या पालकांचे प्रमाण वाढत आहे

Maharashtra says, one or two buses! | महाराष्ट्र म्हणतोय, एक किंवा दोनच बस्स!

महाराष्ट्र म्हणतोय, एक किंवा दोनच बस्स!

 एक किंवा दोन अपत्यांनंतर केलेल्या शस्त्रक्रिया

 
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया : मागील तीन वर्षांपासून मिळतोय चांगला प्रतिसाद
 
पुणे : वाढत्या लोकसंख्येबाबत झालेली जनजागृती, कुटुंबाचा वाढता खर्च अशा विविध कारणांमुळे राज्यात एक किंवा दोन अपत्यांवर समाधान मानणार्‍या पालकांचे प्रमाण वाढत आहे. कुटूंब कल्याण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २00७-0८ या वर्षात एक किंवा दोन अपत्यांवर सुमारे ३ लाख १८ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २0१२-१३ मध्ये हा आकडा सुमारे ३ लाख ४३ हजारांवर पोहचला. तर २0१३-१४ मध्ये मार्चअखेरपर्यंत ३ लाख २२ हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
१९८१-१९९१ च्या दशकात २५.७३ टक्के असलेले लोकसंख्या वाढीचे प्रमाण २00१-२0११ या दशकात १५.९९ टक्के पर्यंत कमी झाले. राज्यात एक किंवा दोन अपत्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करणार्‍या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. २000 मध्ये राज्य सरकारच्या अजेंड्यावरच हा विषय घेण्यात आला. काही वर्षांपासून वाढत गेलेल्या महागाईचा परिणामही होत आहे. वंशाचा दिवा म्हणून मुलाच्या प्रतिक्षेत असलेल्या जोडप्यांचे प्रमाणही कमी होऊ लागले असून एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे 'हम दो हमारे दो', 'हम दो हमारा एक' असे म्हणणार्‍यांची संख्या वाढत आहे. 
कुटूंब नियोजन कार्यक्रमांतर्गत राज्यात २00७-0८ मध्ये एकुण ५ लाख ५४ हजार २८४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी ३ लाख १८ हजार ७१ शस्त्रक्रिया १ किंवा २ अपत्यांवर झाल्या आहेत. ही टक्केवारी ५७. ३८ टक्के एवढी आहे. एकूण शस्त्रक्रियेच्या तुलनेत एक किंवा दोन अपत्यांवर केल्या जाणार्‍या शस्त्रक्रियांचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढत आहे. २0१३-१४ या वर्षामध्ये मार्च अखेरपर्यंत झालेल्या एकुण ५ लाख ४ हजार २३३ शस्त्रक्रियांमध्ये ३ लाख २२ हजार ५३२ शस्त्रक्रिया एक किंवा दोन अपत्यांवर करण्यात आल्या. मागील वर्षी ३ लाख ४३ हजार ६११ शस्त्रक्रिया झाल्या. 
 
राज्य सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच राज्यात बालकांच्या आरोग्याच्या सुविधांमध्ये चांगली वाढ झाली असल्याने बालकांचा मृत्यु दर कमी झाला आहे. महिलांचे वाढते शिक्षण, नोकरीच्या संधी तसेच राज्य सरकारच्या इतर विभागांच्या असलेल्या योजनांचा एकत्रित परिणाम कुटूंब नियोजनावर होत आहे. त्यामुळे एक किवा दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया करणार्‍या जोडप्यांचे प्रमाण वाढत आहे.  - डॉ. एस. जे. कुलकर्णीसहायक संचालक, कुटुंब कल्याण विभाग. 
 
(मार्च अखेपर्यंत) वर्षएकूण १-२ अपत्यांवर टक्केवारीशस्त्रक्रिया शस्त्रक्रिया
२00७-0८५,५४,२८४३,१८,0७१५७.३८
२00८-0९५,४0,0१२३,१९,८३५५९.२३
२00९-१0५,३३,९११३,१७,७0७५९.५१
२0१0-११४,९२,४७८३,0६,२६९६२.१९
२0११-१२४,९४,६९१३,0८,८८९६२.४४
२0१२-१३५,0५,१२0३,४३,६११६८.0२
२0१३-१४५,0४,२३३३,२२,५३२६४.00 
 
(प्रतिनिधी) 
 

Web Title: Maharashtra says, one or two buses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.