शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

Coronavirus: दिलासा! राज्यात मृत्यूसंख्येत घट, रिकव्हरी रेट ९५.७३ टक्के; १४ हजार ३४७ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 21:14 IST

Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराज्याचा रिकव्हरी रेट ९५.७३ टक्केगेल्या २४ तासांत १४ हजार ३४७ रुग्ण कोरोनामुक्तमुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ७३४ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.७३ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ९ हजार ७९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports  9798 new corona cases and 198 deaths in last 24 hours) 

“कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ९ हजार ७९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १४ हजार ३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ९९ हजार ९८३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३४ हजार ७४७ इतकी आहे.

मुंबईकरांना दिलासा

मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ७६२ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ६८४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २६६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १४ हजार ८६० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७३४ दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ९० लाख ७८ हजार ५४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख ५४ हजार ५०८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ८ लाख ५४ हजार ४६१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ८३१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या