शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,०३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २१६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 21:40 IST

Coronavirus: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक असे वृत्त आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यात एकूण ५ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदगेल्या २४ तासांत ४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्तयाच कालावधीत २१६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक असे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०४ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ५ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 5031 new corona cases and 216 deaths in last 24 hours) 

मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ०३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २१६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५० हजार १८३ इतकी आहे. 

मुंबईकरांच्या चिंतेतही काहीशी भर 

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ३४३ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २७२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९५६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २ हजार ८५५ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १८८४ दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २८ लाख ४० हजार ८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ३७ हजार ६८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात २ लाख ९८ हजार २६४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार २६९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. धुळे, नंदुरबार, वाशिम, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई