शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के; ३६ हजार रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 20:48 IST

CoronaVirus: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे.

ठळक मुद्देराज्यातील रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के३६ हजार रुग्णांची कोरोनावर मातमुंबईकरांनाही दिलासादायक वृत्त

मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत तब्बल ३६ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २४ हजार १३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 24 136 new corona cases and 601 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २४ हजार १३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ६०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३६ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख १४ हजार ३६८ आहे.

पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले

मुंबईकरांनाही दिलासादायक वृत्त

गेल्या सलग ६ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून, मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ०३७ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ४२७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७०८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २७ हजार ६४९ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३४५ दिवसांवर गेला आहे. 

 ५० टक्के लसीकरण पूर्ण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, पण...; अस्लम शेख यांचे सूचक विधान

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख २६ हजार १५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २० हजार ८२९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकार