शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

CoronaVirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९२ टक्के; ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:15 PM

CoronaVirus: गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे.

ठळक मुद्देमुंबईतील रुग्णदुपटीचा कालाावधी ३३४ दिवसांवरराज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख २७ हजार ५८०सोमवार दिवसभरात ४२ हजार रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.५१ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २२ हजार १२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 22 122 new corona cases and 361 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २२ हजार १२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख २७ हजार ५८० आहे.

आदित्य ठाकरे जनतेसाठी अहोरात्र काम करतायत, ते भाजपवाल्यांना दिसत नाही; शिवसेनेचा पलटवार

मुंबईलाही मोठा दिलासा

गेल्या सलग ५ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असून, मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५७ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ३१२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ६७१ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २८ हजार ८६ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.२० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३३४ दिवसांवर गेला आहे. 

‘लॉकडाऊन’मध्येही उत्तम कामगिरी; केंद्रातील मोदी सरकारला मोठा दिलासा

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ०२ हजार १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २७ लाख २९ हजार ३०१ जण गृहविलगीकरणात आहेत. तर २४ हजार ९३२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र