शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:38 IST

Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने पुढील २४ तासांत कोकणातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंट अलर्ट दिला गेला आहे. 

Maharashtra Rain Alert: राज्यातील काही भागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली असून, रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाण्यासह इतर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल. १५ आणि १६ जून रोजी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्गला १६ जून रोजी रेड अलर्ट दिला गेला आहे. 

मुंबई-ठाणे, घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

१४ आणि १५ जून रोजी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. विजांच्या कडकडाटासह ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

वाचा >>आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर

महाराष्ट्राच्या उर्वरित भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाज