शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या सीटी स्कॅन दरनिश्चिती विरोधात 'महाराष्ट्र रेडिओलॉजी' संघटना न्यायालयात जाणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 19:36 IST

सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या सीटी स्कॅनसाठी अतिरिक्त उपाययोजनांचा खर्च वाढल्याने निश्चित केलेले दर न परवडणारे आहेत,

ठळक मुद्देयाविरोधात सोमवारी उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली जाणार कोरोनामुळे सीटी स्कॅनची मागणीत वाढ

पुणे : छातीच्या सीटी स्कॅन चाचणीच्या राज्य शासनाने निश्चित केलेल्या दोन ते तीन हजार रुपये दराविरोधात महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या सीटी स्कॅनसाठी अतिरिक्त उपाययोजनांचा खर्च वाढल्याने निश्चित केलेले दर न परवडणारे आहेत, त्यामुळे या दरनिश्चितीला स्थगिती देण्याची मागणी असोसिएशनकडून केली जाणार आहे.राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे सीटी स्कॅनची मागणीही वाढली आहे. कोरोनानंतर फुफ्फुसामध्ये विषाणु संसर्ग होऊन न्युमोनिया होत आहे. काही वेळा एक्स-रेमधून छातीतील संसर्ग दिसत नाही. फुप्फुसाला किती आणि कोणत्या ठिकाणी संसर्ग झाला आहे, याचे निदान सीटी स्कॅन चाचणीत अचूक होत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून या चाचणीला प्राधान्य दिले जात आहे.  नागरिकांना त्यासाठी पाच ते दहा रुपये मोजावे लागत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत होत्या. त्यानुसार शासनाने अडीच हजार रुपये दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाविरोधात रेडिओलॉजी तंत्रज्ञांमध्ये नाराजीचा सुर आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप कवठाळे म्हणाले, कोरोना संशयित किंवा रुग्णांचे सीटी स्कॅन करायचे असल्यास त्यासाठी पीपीई कीट, मास्क तसेच सॅनिटायझेशनचा खर्च वाढला आहे. तंत्रज्ञ व अन्य कर्मचारीही वाढीव वेतन मागतात. तरीही आम्ही मागील वर्षीच्या दराप्रमाणे सीटी स्कॅनचे शुल्क घेत होतो. राज्यात सुमारे ४ ते ६ हजारपर्यंत शुल्क आकारले जाते. आम्ही ३ ते ५ हजार शुल्क निश्चित करण्याची विनंती केली होती. पण शासनाने परस्पर दर निश्चित केले. हे दर न परवडणारे असल्याने याविरोधात सोमवारी उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे.-----------------------पुण्यामध्ये सीटी स्कॅनसाठी सरासरी ४ ते ७ हजार रुपये शुल्क आकारले जाते. रुग्णालय व मशीननुसार हे दर बदलत असतात. कोरोनामुळे सीटी स्कॅनची मागणी वाढली आहे. सीटी स्कॅन मशीनची एकत्रित नोंद होत नसल्याने शहरातील निश्चित आकडा सांगता येणार नाही.- डॉ. राजलक्ष्मी देवकर, अध्यक्ष, पुणे शहर रेडिओलॉजी असोसिएशन,

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यState Governmentराज्य सरकारRajesh Topeराजेश टोपेCourtन्यायालयhospitalहॉस्पिटल