शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

By संतोष कनमुसे | Updated: June 8, 2025 19:28 IST

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भाष्य केले. यावर आता आमदार नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : महाराष्ट्र विधासभा निवडणूक प्रक्रियेवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले.  गांधी यांनी या आधीही या निवडणुकीवर संशय व्यक्त केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ( शनिवारी ७ जून) रोजी गांधी यांना प्रत्युत्तर दिले. "महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहि‍णींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे", असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, आता काँग्रेस आमदार नाना पटोल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. 

पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात

आज पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांचे लेख माध्यमात प्रसिद्ध झाले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग झाल्याचे म्हटले होते. याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचे होते. पण, भाजपाचेच अंधभक्त ज्यांनी लोकशाहीचा घात केला. लोकशाहीचा खून केला. ज्यांनी जनतेशी बेईमानी करुन सत्तेत बसले आहेत ते राहुल गांधी यांच्यावर तुटून पडले आहेत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 

"राहुल गांधी यांचा लोकशाही वाचली पाहिजे यासाठी प्रयत्न आहे. पण लोकशाहीला संपवण्याचं काम केंद्रातील सरकार करत आहे. आज आमचे मित्र फडणवीस यांनी सांगितलं की राहुल गांधी संविधानिक संस्थांवर आरोप घेत आहेत. "माझा फडणवीस यांना प्रश्न आहे, पहिल्या अधिवेशनावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर फडणवीस यांनी का द्यावे?", असा सवालही नाना पटोले यांनी केला.

'आम्हाला मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय' 

"जी ४६ लाख मतं वाढली आहेत. ती कोण आहेत? आम्ही याबाबत पुरावे दिली आहेत. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं आहे. निवडणूक आयोग माध्यमांसमोर का आले नाहीत. ट्विटच्या माध्यमातून आकडेवारी त्यांनी दिली. आम्ही निवडणूक आयोगाला फुटेज मागितले. यावर आयोगाने फुटेज देत येत नाही असा जावई शोध काढला. यामुळे आता आम्हाला मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्ट आम्हाला सहकार्य करेल ही आमची अपेक्षा आहे, असंही पटोले म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा