शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 10:14 IST

नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय.

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा  सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. एका पार्टीत बडगुजर हे कुत्तासोबत नाचत असल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती. त्यानंतर आता बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. महत्त्वाची बाब म्हणजे आदल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी एका सभेत बोलताना बडगुजरांचे नाव न घेता टीका केली होती.

सुधाकर बडगुजर यांच्यावर ऐन निवडणुकीच्या काळात तडीपारीची कारवाई करण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय. सुधाकर बडगुजर यांना पोलीस यासंदर्भातील नोटीस बजावण्यासाठी गेले होते मात्र त्यांनी ती स्विकारली नाही. बडगुजर यांनी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ही कारवाई झाल्याचे म्हटलं जात आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता प्रकरणात चौकशी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे चर्चेत आले होते. नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे गटाचे जिल्हासंपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी बडगुजर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्‍यांनी याबाबीत विधान केलं होतं. 

'तो कुत्तावाला कोण आहे?' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान विचारला. त्यावेळी कार्यकर्त्यांमधून सुधाकर बडगुजर अशी घोषणा देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्वानाचाही अपमान होईल असं म्हटलं. त्यानंतर कार्यकर्त्यांमधून संजय राऊत यांच्याही नावाचा उल्लेख झाला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सगळे लोक त्यांना पाडा असे बोलत होते. मी बोललो जाऊदे आपलं कर्तव्य आपण करु. पण नंतर मला पश्चाताप झाला. परत संधी येईलच. ते नगरसेवक तरी होऊ शकतात का? असा सवाल विचारला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे