शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज, मूठ घट्ट राहिली पाहिजे"; सुनंदा पवार यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:29 IST

Maharashtra Politics : आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांबाबत मोठं विधान केले आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : काल १२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या  वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिल्लीत खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.  दरम्यान, आता आमदोर रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा

टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार आणि खासदार शरद पवार यांच्या भेटीवर बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, मी या भेटीकडे कौटुंबिक भेट म्हणून पाहत आहे. कारण काल पवार यांच्यासाठी महत्वाचा दिवस होता. काल त्यांचा ८५ वा वाढदिवस होता. काल सगळे शुभेच्छा देण्यासाठी तिकडे गेले होते. ही भेट राजकीय आहे का हे मला सांगता येणार नाही, असंही सुनंदा पवार म्हणाल्या. 

"कसंही वागले तरीही टीका होत असते. अजित पवार कुठेही गेले तरीही बातम्या होत असतात. 'दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतील का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाल्या, यावर काही सांगता येणार नाही. कुटुंबात मतभेद असतातच, मतभेद मिटतील. भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं मोठं विधान आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे. 

"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत. मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते, त्यामुळे एकत्र राहणे महत्वाचे राहिलं, असंही सुनंदा पवार म्हणाल्या. 

"पक्षातील नवे उमदे आमदार निवडून आले आहेत त्यांना जर पक्षाची, संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष पुन्हा वाढेल, असंही पवार म्हणाल्या. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार