शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 20:26 IST

Maharashtra Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असून, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Political News:  राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावर (Cabinet Expansion) चर्चा होण्याची शक्यता आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रडखडलेला आहे. सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरच चर्चा होऊ शकते. तसेच, सध्या राज्यातसह केंद्रातही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

या बैठकीनंतरच दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे समोर येईल. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची काल रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी माहिती बैठकीनंतर समोर आली आहे. त्यामुळे आजच्या एकनाथ शिंदेंचा दौराही महत्वाचा मानला जात आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहdelhiदिल्लीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा