शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदार आज गुवाहटीवरुन गोव्याला येणार? उद्या होणार फ्लोअर टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:36 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे.

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. मात्र, फ्लोअर टेस्टमध्ये पाठिंबा मिळेल, असे उद्धव सरकारचे म्हणणे आहे. यादरम्यान शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घाबरवण्यासाठी, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

आज गोव्याला येणार बंडखोर आमदार?उद्या होणाऱ्या प्लोअर टेस्टसाठी बंडखोर आमदार मुंबईला येणार आहेत. पण, गुवाहाटीचे हवामान झपाट्याने बदलत असल्याचे जाणकारांचे मत आहे. खराब हवामानामुळे उड्डाणांवरही परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत उध्या फ्लोअर टेस्टच्या वेळी मुसळधार पाऊस झाला किंवा फ्लाइटमध्ये अडचण आली तर प्रकरण आणखी बिघडू शकते. त्यामुळेच बंडकोर आमदार आज गोव्याला येणार असल्याची माहिती मिळ आहे. बंडखोरांसाठी गोवा सेफ झोन आहे. तेथून मुंबईला येणे सोपे आहे. शिवाय, गोव्यातील सुरक्षाही चोख असेल, कारण तेथेही भाजपचे प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत. 

भाजप आमदार आज मुंबईत येणारया सर्व राजकीय गदारोळात फ्लोअर टेस्टसाठी भाजपने सर्व आमदारांना आज मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपच्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदार, अपक्ष समर्थक आमदारांना आज संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचून फडणवीस यांची भेट घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस