शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
2
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
3
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
4
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
5
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
6
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
7
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
8
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
9
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
10
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
11
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
12
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
13
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
14
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
15
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
16
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
17
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
18
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
19
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
20
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरण प्रस्तावाचा वाद; शिवसेनेचा एक्झिट प्लॅन ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:30 IST

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आ

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अन्य ११ आमदारांनी मविआचं समर्थन काढलं आहे. त्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे निर्देश देत ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यपालांच्या निर्देशाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा कोर्टाच्या निर्णयाकडे आहेत. यातच शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणत सरकारमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन बनवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री अनिल परब यांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं असा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत आणला जाणार आहे. औरंगाबादसोबत उस्मानाबादचं धाराशीव नामांतरण करावं असाही प्रस्ताव कॅबिनेट समोर आणला जाईल.

शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आता सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत चाचणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सामोरे जायचं आहे. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतरणाचा प्रस्ताव आणून शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची एक्झिट प्लॅन ठरवला आहे असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. 

औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलं होतं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ