शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: ठाकरेंचे दूत पोहोचण्याआधीच भाजप आमदार सुरतमध्ये; एकनाथ शिंदेंशी चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:58 IST

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सूरतला येऊन एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार सुरतमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले दोन दूत सुरतला पाठविले आहेत. मात्र, ते पोहोचण्याआधीच भाजपाच्या आमदारांनी आतमध्ये एन्ट्री केली आहे. 

भाजपाचे आमदार संजय कुटे हे नुकतेच एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार थांबलेल्या ली मेरीडिअन हॉटेलमध्ये गेले आहेत. सुरुवातीला पोलिसांनी त्यांची कार हॉटेलच्या बाहेरच रस्त्यावर थांबविली होती. आत पाठविले जात नव्हते, यानंतर फोनाफोनी झाली आणि कुटे यांना आतमध्ये पाठविण्यात आले आहे. अद्याप शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर तिथे पोहोचलेले नाहीत. या दोघांना आतमध्ये जाऊ दिले जातेय का? हे लवकरच समजणार आहे. 

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सूरतला येऊन एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी भाजपाने या हॉटेलशेजारील एक फार्महाऊस देखील बुक केल्याचे समजते आहे. हे फार्महाऊस मंगलप्रात लोढा यांच्या नावावर बुक करण्यात आले आहे. दरम्यान, संजय कुटे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे समजते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा