शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Maharashtra Political Crisis : "१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून...", भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:12 IST

Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबतच जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसे संकेतही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीने गेल्या आठवडाभरापासून घडामोडी घडत आहेत, त्या पाहता पडद्यामागून भाजपच या बंडखोरांना पाठिंबा देत असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

"१०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून देवेंद्र फडणवीस यांना हिणवणाऱ्यांनो, त्याच देवेंद्र फडणवीस यांनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय!", असे ट्विट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत शिवेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर, याआधीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी भाजपचे १०५ आमदार घरी बसवले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला एकत्र आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री त्यांनी करून दाखवला, हाच राग भाजप नेत्यांच्या मनात आहे. यालाच ते गुन्हा मानत आहेत, म्हणून ईडीचा ससेमिरा राऊत यांच्या मागे लावण्यात आला असल्याचा आरोप युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांनी केला होता. तर भाजपच्या १०५ आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात काय दम आहे, हे दाखवून दिलं आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी लगावला होता.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या एक ते दोन दिवसात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. याशिवाय, आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवानाशिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे निघाले असून आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांचे सहकारी बंडखोर आमदार गोव्यातच असून ते एकटेच मुंबईकडे निघाले आहेत. दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह तळ ठोकून होते. दुपारी १२.१५ च्या सुमारास केवळ शिंदे हॉटेलमधून विमानतळाकडे जाण्यासाठी बाहेर पडले. पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, 'मी मुंबईला राज्यपालांची भेट घेण्यासाठी जात आहे. माझे सहकारी आमदार तूर्त गोव्यातच राहतील.'

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv Senaशिवसेना