शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 12:18 IST

Maharashtra Politcs : मुख्यमंत्रिपदावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपाने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, काही दिवसापासून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, नवीन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत भारतीय जनता पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चा आणि जातीय समीकरणांच्या आधारे निर्णय घेण्याची शक्यता यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

युगेंद्र पवारांनीही मतपडताळणीसाठी अर्ज केला; अजून काका अजित पवारांचे अभिनंदन केलेले नाही.

आरएसएसने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्याबाबत चर्चा केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला.आरएसएसने त्यांना पसंती दिली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत भाजपच्या एका गटाने मुख्यमंत्रिपदासाठी अन्य दावेदारांची नावे पुढे केली आहेत.

राजकीय वर्तुळात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेत आहेत. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, मोहोळ हे मराठा समाजातील नेते आहेत. बावनकुळे हे ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यांच्या संभाव्य नावांमुळे जातीय समीकरणे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीत ही बाब लक्षात घ्यायला हवी, असे या नेत्यांच्या समर्थकांचे मत आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत सुरू असलेल्या गोंधळामुळे संघ परिवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीदरम्यान आरएसएसने देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ३००० स्वयंसेवकांसह मोहीम राबवून महायुतीचा भव्य विजय निश्चित करण्यात आला.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरएसएसने भाजप नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला आहे की, फडणवीस यांची निर्णायक भूमिका लक्षात घेऊन त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करावी. तसे न केल्यास आगामी निवडणुकीत, विशेषतः बीएमसी निवडणुकीत पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते, असंही संघाने सांगितल्याचे बोलले जात आहे. नेते संघाचे मार्गदर्शनाचे पालन करत नाहीत यामुळे संघ नाराज असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजातील असल्याचे संघाचे म्हणणे आहे. अशा स्थितीत भाजपच्या काही नेत्यांनी मराठा मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरण्याला कोणतेही कारण नाही, असंही संघाचे मतआहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाच्याही चर्चा सरू होत्या. दरम्यान आता मोहोळ यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या चर्चा अफवा असल्याचे सांगितले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ