मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ७५ पदके जाहीर झाली असून, यात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. ७५ पदकांमध्ये ३१ शौर्य, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ४० पदकांचा समावेश आहे.
मुंबई पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) महेश पाटील, पोलीस उपायुक्त (बिनतारी संदेश विभाग) बाळकृष्ण यादव आणि वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सायरस इराणी यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय ९ पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे.
८९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवापदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Web Summary : Maharashtra Police received 75 medals, including 31 for bravery. Mahesh Patil, Balkrishna Yadav, and Cyrus Irani received the President's Police Medal for distinguished service. Nine officers will be awarded police medals for meritorious service.
Web Summary : महाराष्ट्र पुलिस को 75 पदक मिले, जिनमें 31 वीरता के लिए हैं। महेश पाटिल, बालकृष्ण यादव और साइरस ईरानी को विशिष्ट सेवा के लिए राष्ट्रपति पुलिस पदक मिला। नौ अधिकारियों को सराहनीय सेवा के लिए पुलिस पदक से सम्मानित किया जाएगा।