शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाचा आज ‘सर्वोच्च’ फैसला, संपूर्ण देशाचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 10:36 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय मंगळवारी काय निकाल देणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागलेली आहे.

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय मंगळवारी काय निकाल देणार याबाबत  प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा इम्पिरिकल डेटा समर्पित आयोगामार्फत तयार करा आणि तो सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने हा डेटा तयार केला व तो राज्य सरकारकडे सुपूर्द केला. राज्य सरकारने तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. याआधी महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगामार्फत असा डेटा तयार केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. तथापि, मध्य  प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी सादर केलेला डेटा स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने तेथील ओबीसी आरक्षण बहाल केले होते.

या पार्श्वभूमीवर उद्याची सुनावणी महाराष्ट्रातील ओबीसींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसींनाही राजकीय आरक्षण पुन्हा बहाल केले तर त्यावरूनही श्रेय-अपश्रेयाची राजकीय लढाई रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र