पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्टला पाच वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अंनिसतर्फे राज्यभरात ‘जवाब दो आंदोलन’ छेडण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारने गौरी लंकेश खून तपासात मोठी प्रगती केली असून महाराष्ट्र शासन व सीबीआयला मात्र दाभोलकरांचे मारेकरी शोधण्यात का अपयश येत आहे, याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे, नागपूर, औरंगाबाद सह राज्यांतील सर्व प्रमुख शहरांमध्ये आंदोलन होणार आहे.
अंनिसच्या वतीने सोमवारी राज्यात ‘जवाब दो आंदोलन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 06:02 IST