राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील जवळीक सर्वांच्याच परिचयाची आहे. परंतु एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला. लोकमतच्या फेस टू फेस या कार्यक्रमात आव्हाड यांनी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपल्या लहानपणापासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा केला. यावेळी बोलताना आव्हाड यांनी १९८८ मध्ये सुरेश कलमाडींनी आपल्याला पहिल्यांदा शरद पवार यांच्याकडे नेलं होतं असं सांगितलं."सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेलं. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. शरद पवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो आणि ते जात असले तरी मी विमानतळावर उभा असायचो. कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी विमानतळावर जायचो. जवळजवळ १२ वर्ष मी हे केलं. आधी त्यांचं लक्ष नसायचं. पण जसं जसं त्यांना माझा चेहरा परिचयाचा वाटायला लागला तेव्हा त्यांनी ओळखही देण्यास सुरूवात केली," असं आव्हाड म्हणाले.
शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 11:27 IST
Jitendra Awhad-Sharad Pawar : एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला.
शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा
ठळक मुद्देएकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला.